G. V. Prakash Kumar - Adada Song Lyrics

Lyrics Adada Song - G. V. Prakash Kumar




हे, देवा तू सांगना? कुठ गेला हरवुनी?
लेकराची आन तुला अवतर आता तरी
देवा तू सांगना? कुठ गेला हरवुनी?
लेकराची आन तुला अवतर आता तरी
अंधारल्या दाही दिशा अन बेजारलं मन
उर जळून निघालं, बघ करपल मन
आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा
रीत तुझ्या दावण्याला माझा काय रं गुन्हा?
उरामंदी जाळ पेटला जन्माची राख झाली रं
ईस्कटलेली दिशा ही धुरामंदी वाट गेली रं
जिन धुळीवानी झालं नेलं वार्याने उडून
अवकाळी वादळात जीव लपेटून गेलं
आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा
रित तुझ्या दावण्याला माझा काय रं गुन्हा?
काळजाव घाव घातला, जिव्हारी गेला तडा रं
निखाऱ्याची वाट दिली तू पायतानं न्हाई पायी रं
कुठं ठेऊ मी रं माथा? दैव झाला माझा खुळा
असा कसा माय-बापा तू रं बेफिकिरी झाला
आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा
रीत तुझ्या दावण्याला माझा काय रं गुन्हा?




Attention! Feel free to leave feedback.