Ajay Gogavale feat. Yogita Godbole - Vaat Disu De текст песни

Текст песни Vaat Disu De - Ajay Gogavale , Yogita Godbole



वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
वाट दिसू देगा देवा
वाट दिसू दे
वाट दिसू देगा देवा
गाठ सुटू दे
(संग सोबतीची साथ)
(मग दिवाभीत रात)
(आज पहाटंच्या पावलाला)
(श्वास फुटू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(वाट दिसू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(गाठ सुटू दे)
हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यानं
वसाडाचं रान झालं जी
आरं मातीच्या पोटात आस्मानच बळ
माऊलीची लाज राख जी
या मिणमिणत्या दिव्याला तू साकड घाल
या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन
हे धगधगत्या निखाऱ्याला मायेची ओल
या रखरखत्या भुईला दे घामाचं मोल
केली निंदनी पेरणी
उधळून जिंदगानी
कुणब्याचं सारं रान
आबादान हसू दे
(वाट दिसू देगा देवा)
(वाट दिसू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(गाठ सुटू दे)
भल्याची पुण्याई हुभी तुझ्या माग
जरा निगतीनं वाग जी
आरं ढळून इमान लागू नये डाग
दिल्या सबुदाला जाग जी
या सळसळत्या वादळाला आलं उधाण
या लखलखत्या आभाळाचं चांदण न्यारं
या रगरगत्या उन्हानं चेतवलं भान
हे कोसळत्या पावसाची अनादी काळ
(मन शुद्ध निर्मळ, सत्वाचा परिमळ)
(या अरुपाचं रूप आरशात दिसू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(वाट दिसू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(गाठ सुटू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(वाट दिसू दे)
(वाट दिसू देगा देवा)
(गाठ सुटू दे)
संग सोबतीची साथ
मग दिवाभीत रात
आज पहाटंच्या पावलाला
श्वास फुटू दे
वाट दिसू दे
देवा, वाट दिसू दे
वाट दिसू दे
देवा, वाट दिसू दे



Авторы: Atul Gogavale, Ajay Gogavale, Rooh Rooh


Ajay Gogavale feat. Yogita Godbole - Jau Dya Na Balasaheb (Original Motion Picture Soundtrack) - EP
Альбом Jau Dya Na Balasaheb (Original Motion Picture Soundtrack) - EP
дата релиза
16-09-2016



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.