Asha Bhosle - Hi Waat Dur Jaate Songtexte

Songtexte Hi Waat Dur Jaate - Asha Bhosle




ही वाट दूर जाते
ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा
ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
ही वाट दूर जाते
जेथे मिळे धरेला
आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे
रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी
जेथे खुळ्या ढगांनी
रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा
स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला
मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखांचा
स्वप्नींच वेध घ्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
ही वाट दूर जाते
घे साऊली उन्हाला
कवळून बाहुपाशी
लागुन ओढ वेडी
खग येति कोटरासी
एक एक चांदणीने
एक एक चांदणीने
नभदीप पाजळावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
ही वाट दूर जाते
स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
ही वाट दूर जाते



Autor(en): Shanta Shelke



Attention! Feel free to leave feedback.