Lalita Phadke - Zalega Bai Sansarache Hanse Songtexte

Songtexte Zalega Bai Sansarache Hanse - Lalita Phadke




हो, मिटून घेतले नेत्र तरी
ते चित्र मनाला दिसे, चित्र मनाला दिसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
मी वाट पाहते बसुनी तुमची घरी
तुम्ही रात जागता भलतीच्या मंदिरी
पडणेच कपाळी चुकल्यावर पायरी
पडणेच कपाळी चुकल्यावर पायरी
तोल सोडुनी तुम्ही वागता, तुम्हा सावरू कसे?
सावरू कसे? सावरू कसे?
झाले संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
कुणी म्हणे तुम्हाला शुद्धच नसते कधी
तिजसवे जेवता एका ताटामधी
कोठून शोधू या रोगावर औषधी?
कोठून शोधू या रोगावर औषधी?
जीभा जगाच्या कानी ओतती जसे तापले शिसे
तापले शिसे, तापले शिसे
झाले संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
भाळला नाथ हो सौख्याला कोणत्या, कोणत्या?
तुम्ही मांजर झाला ताटाखाली तिच्या, हो तिच्या
संपल्या कथा आता नीतीच्या-प्रीतीच्या
संपल्या कथा आता नीतीच्या-प्रीतीच्या
नीतीहीनाची अनाथ बाईल, कोण तियेला पुसे?
तियेला पुसे, तियेला पुसे
झाले संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे
झाले गं बाई, संसाराचे हसे



Autor(en): G D Madgulkar, Sudhir V Phadke



Attention! Feel free to leave feedback.