Lata Mangeshkar - Chand Kevadyachi Raat Songtexte

Songtexte Chand Kevadyachi Raat - Lata Mangeshkar




चांद केवड्याच्या रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबार्याला बांधावा गजरा
तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा
माझं जीवन आलंया मोहोरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहिरा, मन वादळ वार्यांत भोवरा
शुभ्र काचेत पारा तसा संग चातुरा
हिरव्या आषाढ बनात डांगोरा, कसा पान्यात लाविला अंगारा
जरा बांध गजरा, माझी आण शाहिरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा



Autor(en): N D MAHANOR, HRIDAYNATH MANGESHKAR, N.D.MAHANOR


Attention! Feel free to leave feedback.