Mahendra Kapoor & Asha Bhosle - Ajab Hi Madhuchandrachi Raat Songtexte

Songtexte Ajab Hi Madhuchandrachi Raat - Mahendra Kapoor , Asha Bhosle




मधु इथे अन् चंद्र तिथे, झुरतो अंधारात
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात
माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात
संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात
किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वार्यावरची वरात
वार्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात



Autor(en): N.DUTTA, N DUTTA, G.D.MADGULKAR, G D MADGULKAR



Attention! Feel free to leave feedback.