Asha Bhosle & Mahendra Kapoor - Sahavas Sagaracha Lyrics

Lyrics Sahavas Sagaracha - Mahendra Kapoor , Asha Bhosle




सहवास सागराचा, सहवास डोंगरांचा
झाडीत झाकलेला दिसतो थवा घरांचा
ऐशा कुणा घराशी माझे जडले नाते,
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
सहवास सागराचा...
या डोंगराळ देशी...
या डोंगराळ देशी भूभाग चार हाती
शिंपून घाम तेथे करीतात लोक शेती
तंव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथे?
तंव चित्र काव्यवेडे कोठे जडेल तेथे?
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
सहवास सागराचा...
ओ, जेथे असाल तुम्ही...
जेथे असाल तुम्ही दिन-रात, प्राणनाथा
तो गाव स्वर्ग माझा, ते गेह स्वर्ग माझा
मज आवडेल सारे तेथे घडेल ते-ते
मज आवडेल सारे तेथे घडेल ते-ते,
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
नव नार नागरी तू, तुज आवडेल का ते?
सहवास सागराचा...




Attention! Feel free to leave feedback.