Jaanvee Prabhu Arora - Man He Phakru Lyrics

Lyrics Man He Phakru - Jaanvee Prabhu Arora



वळणावरी जणू चाहूल लागली
वाऱ्यासवे कुणी ये चोर पावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू, कसे मी सावरू?
मन हे पाखरू, कसे मी सावरू?
नकळत कोणत्या दिशेला जाई सांग ना
उलगडते कसे अबोल नाते बोल ना
मन हे पाखरू, कसे मी सावरू?
पाखरा, पाखरा रे
दूरच्या देशी उडूनी जाशी
मला ही नेशी सोबतीने
पाखरा रे
गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवूनी पुन्हा मन कसे गुंतते
पाखरा रे
गुंतलेल्या क्षणी सावरू वाटते
सोडवूनी पुन्हा मन कसे गुंतते
रानभर हे कसे मोरपंखी ठसे
होई वेडेपिसे असे मन पाखरू
आसमंती दिसे असे मन पाखरू, पाखरू
क्षण एक भेटते, विरतेच सावली
वाऱ्यासवे कुणी ये चोर पावली
आभाळ मोकळे माझे मला मिळे
स्वप्नास मी लावले पंख हे नवेसे
मन हे पाखरू, पाखरू
पाखरू, पाखरू मन हे झाले
सावरू मी कसे कळले
भिरभिरु लागे, गुणगुणू लागे
बागडावे जसे मन पाखरू
मन पाखरू, पाखरू



Writer(s): Mandar Cholkar, Nilesh Vijay Moharir


Jaanvee Prabhu Arora - Friends (Original Motion Picture Soundtrack) - EP



Attention! Feel free to leave feedback.