Chorus - Janma Baicha Lyrics

Lyrics Janma Baicha - Rahul Ranade



जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
एक आईचा, आईचा, एक ताईचा
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
एक आईचा, आईचा, एक ताईचा
बाहुली होती खेळ खेळाया
बाहुली होती खेळ खेळाया
जाहली मोठी मोहरे काया
जाहली मोठी मोहरे काया
घम-घमे सारा गंध जाईचा
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
एक आईचा, आईचा, एक ताईचा
फुल होतांना ही कळी लाजे
फुल होतांना ही कळी लाजे
पैंजनापाशी काय हे वाजे?
शोधते आता हात साथिचा
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
एक आईचा, आईचा, एक ताईचा
काय मी सांगू? काय हे झाले?
का तुला सखये न्हाहने आले?
माय ही सांगे अर्थ मायेचा
माय ही सांगे अर्थ मायेचा
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
जानवे आता वेगळे काही
जानवे आता वेगळे काही
रंगल्या साऱ्या या दिशा दाही
भास कोणाचा रोज रातीचा?
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
जन्म बाईचा, बाईचा खूप घाईचा
एक आईचा, आईचा, एक ताईचा



Writer(s): Kishor Kadam, Rahul Ranade


Chorus - Kaksparsh
Album Kaksparsh
date of release
12-05-2012



Attention! Feel free to leave feedback.