Shankar Mahadevan - Roj Kasa Paoos Gulabi Lyrics

Lyrics Roj Kasa Paoos Gulabi - Shankar Mahadevan




रोज कसा पाऊस गुलाबी
मनात माझ्या रिमझिमतो
श्रावणओल्या आठवणींचा
सुगंध अजुनी दरवळतो
पाऊस ओला स्पर्श रेशमी
अंगअंगही भिजलेले
थरथरणाऱ्या मिठीत कोणी
हळूच डोळे मिटलेले
त्या स्पर्शाचा नाद बिलोरी
स्पंदनातुनी किणकिणतो
हिंदोळ्यावर हिरव्या
श्रावणगाणे गाताना
थेंब टपोरे टिपण्यासाठी
दोन ओंजळी झुलताना
मोहरलेला पाऊसवारा
अजून रानी भिरभिरतो
ओसरल्या त्या पाऊसधारा
क्षण सारे जणू ओसरले
झिमझिमणाऱ्या पावसात हा
पुन्हा पिसारे उलगडले
पानोपानी ऋतू कालचा
अजून गाणे गुणगुणतो



Writer(s): kedar pandit, anil kamble



Attention! Feel free to leave feedback.