Swapnil Bandodkar - Ha Chandra Lyrics

Lyrics Ha Chandra - Swapnil Bandodkar




हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशावेळी मज याद तुझी आली
ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु
अनुरागी, रसरंगी होऊन ये तु
नाजुकशी एक परी होऊन ये तु
वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशिम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरु दे
नाव तुझे माझ्या ओठावर येते
फुल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते अधुरा मी येथे
चांद रात ही बघ निसटुन जाते
बांधिन गगनास झुला जर देशील साथ मला
ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु
अनुरागी, रसरंगी होऊन ये तु
नाजुकशी एक परी होऊन ये तु
हे क्षण हळवे एकांताचे, दाटलेले माझ्या किती भोवताली
चाहुल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तु मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनही तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला, दे आता हाक मला
ये ना, मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तु (ये ना)
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तु (ये ना)
अनुरागी, रसरंगी होऊन ये तु (ये ना)
नाजुकशी एक परी होऊन ये तु




Attention! Feel free to leave feedback.