Nakash Aziz - Salte - Reprise paroles de chanson

paroles de chanson Salte - Reprise - Arijit Singh



सलते का ही बोच मनी
सलते का ही बोच मनी
का सवाल छळतो तोच मनी, तोच मनी
सलते का ही बोच मनी
हृदयी राधा, स्वप्नी मीरा
ओठांवरती बंसुरीया
हृदयी राधा, स्वप्नी मीरा
ओठांवरती बंसुरीया
सहस्त्र सोळा कन्यावरसी
का रे माझ्या कृष्ण प्रिया
तुळस मी साधी, जणू अपराधी
उंबरठ्याची ठेच मनी
का सवाल छळतो तोच मनी, तोच मनी
सलते का ही बोच मनी
नकळे का हे होते असे रे
नकळे का हे होते असे रे
शहाण्यालाही लागे पिसे रे
अंतरांची प्रीत, अंतराची रीत
आंतरिक तेच मनी
का सवाल छळतो तोच मनी
आ... सलते का ही बोच मनी



Writer(s): Mandar Cholkar, Nakash Aziz



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.