Asha Bhosle feat. Varsha Bhosle - Navin Aaj Chandrama paroles de chanson

paroles de chanson Navin Aaj Chandrama - Asha Bhosle feat. Varsha Bhosle




नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी
नवीन आज चंद्रमा...
दूर बाल राहिले, दूर राहिल्या सखी
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी?
अननुभूत माधुरी आज गीत गायनी
आज गीत गायनी
नवीन आज चंद्रमा...
अनादी चंद्र अंबरी, अनादी धुंद यामिनी
यौवनात तू नवी मदीय प्रीत स्वामिनी
घर प्रीतकुंज हा, बैस ये सुहासिनी
बैस ये सुहासिनी
नवीन आज चंद्रमा...
कोण बाई बोलले? वाणी ही प्रियंवदा
कोण बाई बोलले? वाणी ही प्रियंवदा
या वनात नांदते तुझीच प्रीतसंपदा
कशास वेगळेपणा? कशास वेगळेपणा?
जवळ ये विलासिनी, जवळ ये विलासिनी
नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी
नवीन आज चंद्रमा...



Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.