Swapnil Bandodkar - Sawali paroles de chanson

paroles de chanson Sawali - Swapnil Bandodkar




सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलुवार तू दवाचा
अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी
मोह बेधुंद तू मनाचा
विखरून चांद रात काळजात माझिया मोह रे चेहरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलुवार तू दवाचा
ही सांज त्या तारकाची, हृदयी नक्षी तुझ्या रूपाची
टपटपतो मनी तुझाच मोगरा, तुझियासाठी होइ जीव बावरा
विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलुवार तू दवाचा
झुरतो, झुलतो सदा थरारे, जीव हा माझा तुला पुकारे
ये दाटुनी, ओथंबुनी वीरही, सरहि या जीवनी
भिजवून जा अशीच जीवनास माझिया, लागूदे तुझी तृषा
सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी
थेंब अलुवार तू दवाचा




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.