Vaishali Samant - Majhe Moharale Jhaad paroles de chanson

paroles de chanson Majhe Moharale Jhaad - Vaishali Samant




माझे मोहरले झाड
मला घेऊनिया चल
रीतीभातीच्या पल्याड
किती टाकू मी उसासे
घेत जगाचे कानोसे
अशी कशी तुझी ओढ
आता झाली रे उनाड
बघ देह जाळी सारा
ताज्या वयाचा निखारा
माझे दंश ही खुमार
तुझे ओठ ही लबाड
जन्म कापूर कापूर
राहसी कशास दूर
तुझ्यासाठी तारूण्याचे
दार ठेवले सताड





Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.