Asha Bhosle feat. Balakram - Abhas Rangvita Songtexte

Songtexte Abhas Rangvita - Asha Bhosle , Balakram




स्वप्नातल्या फुलांचा होईल काय हार?
आभाळ कोरतो का चित्रातला मिनार?
आली असे विराम येथेच स्नेहगाथा,
आभास रंगविता येणार काय हाता?
आभास रंगविता येणार काय हाता?
आभास ना, सख्या, हा माझी विशुद्ध प्रीती
भवितव्य ठेविले मी सारे तुझ्याच हाती
का रे अशी निराशा तू ओतलीस माथा?
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?
निष्कांचना निराशा ही एक जन्मजोड
निष्कांचना निराशा ही एक जन्मजोड
माझी उबेर कन्ये तुज संगती विजोड
पाषाण होय तारा पृथ्वीतलास येता,
आभास रंगविता येणार काय हाता?
आभास रंगविता येणार काय हाता?
माझ्या-तुझ्या जगाचा व्यवहार रे निराळा
माझ्या-तुझ्या जगाचा व्यवहार रे निराळा
स्वप्नेच स्वर्ग माझा, स्वप्नेच कल्पमाळ
स्वप्नास जीवता दे तू एक प्राणदाता,
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?
का साथ सोडिसी रे, सिद्धी समीप येता?
आभास रंगविता येणार काय हाता?



Autor(en): Ram Kadam, G D Madgulkar



Attention! Feel free to leave feedback.