Sanju Rathod - Kasturi Songtexte

Songtexte Kasturi - Sanju Rathod




नि सा रे सा नि सा रे सा रे
नि सा रे सा नि सा रे सा
तुझ्या रूपाची व्हावी सांजलाबी नवलाई
इतकी अपूर्वाई तू गोजिरी
गं मदनमंजिरी सख्याच्या काळजात वाजं तुझ्या इश्काची खंजिरी
हे ढगांचा ढोल अस्सा वाजतो घणाघणी
रूप तुझं लख्ख गं दामिनी
दिसाचा शिणवटा पेटतो उभ्याघाई
रूप तुझं साजिंदी चांदणी
तू लाख गुणांची माझी हरणी
तुझ्यामुळं जीणं झालं कस्तुरी
तुच माझा राया विठु सावळा
तुच राघव रे तुच मुरारी
तुला पाहून जीणं सजतंय
बाई क्षणात अस्सं घडतंय
डोळ्यात मत्तमोर नाचतो थुईथुई
माझ्या अंगणी तुझ्या पावसाची बोलणी
तू लाख गुणांचा माझा कारभारी
तुझ्यामुळं जीणं झालं कस्तुरी
तू लाख गुणांची माझी हरणी
तुझ्यामुळं जीणं झालं कस्तुरी
तुच माळावास केसात मोगरा
तुच बघावास डोळ्यात चांदवा
अलवार गुंफावा तुझा हात माझ्या हाती
आण खोल खोल जावं मनाच्या तळाला
मीच माळेन गं केसात मोगरा
गंध पसरेल गं भरात चांदवा
सकवार सांगावा डोळ्यांनी डोळ्याला
मोरपिशी सावल्या बिलगाव्या देहाला
हे रातबी वाटतीया दीस तुझ्यामुळं गं
तुझ्यामुळं जिंदगी फुलून आलीया गं
उभा जन्म काढीन तुझ्या हाकेला रं
तुझ्यामुळं सुख आलं पदरी
तू लाख गुणांची माझी हरणी गं
तुझ्यामुळं जीणं झालं कस्तुरी



Autor(en): Lakhan Chaudhari



Attention! Feel free to leave feedback.