Satyasil Deshpande - Mage Pude Pahato Songtexte

Songtexte Mage Pude Pahato - Satyasil Deshpande




मागे-पुढे पहातो, रचितो भविष्य काही
होणार काय आहे, ते मात्र ज्ञात नाही
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गातो परि कळे ना...
गातो परि कळे ना हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती...
आनंद-दुःख यांचे नाते मुळी जुळे ना
ओठांवरील माझ्या गाणे तरी खळे ना
सुखदायी गीत होते साऱ्याच भावनांचे
स्वर शब्दरूप होती...
माझ्याच गायनी मी लयधुंद होत जातो
गाण्यास रागिणीचा हळुवार रंग येतो
वाजे प्रसन्न वीणा, उत्फुल्ल ताल नाचे
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गातो परि कळे ना हे गीत जीवनाचे
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
स्वर शब्दरूप होती...
स्वर शब्दरूप होती...



Autor(en): Hridaynath Mangeshkar, G D Madgulkar




Attention! Feel free to leave feedback.