Rohan Pradhan feat. Shreya Ghoshal - Navasa Ishara Songtexte

Songtexte Navasa Ishara - Rohan Pradhan , Shreya Ghoshal

मी पाहताना तुला कळले नव्याने मला
धागा मनांचा असा हळुवार मी जोडला
भेटू पुन्हा, हरवू पुन्हा, शोधू पुन्हा त्या खुणांना
नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा
नवासा इशारा, हवासा इशारा, मदमोही इशारा तुझा
नकळत कधीतरी नेहमीच्या वाटेवरी
वेगळे वेड लागते
हुरहूर दोघातली, तुझ्या-माझ्या मनातली
ओढ ही गोड वाटते
सांगू पुन्हा, ऐकू पुन्हा, समजू पुन्हा या क्षणांना
नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा
नवासा इशारा, हवासा इशारा, मदमोही इशारा तुझा
भिरभिर वाऱ्यावरी झरझर आल्या सरी
थेंब-थेंब प्रेम वेचते
अलगद मिठीमध्ये हात घे हातामध्ये
बोलू दे नजर, बोलू दे
रंगू पुन्हा, तरंगू पुन्हा, बिलगू पुन्हा सावल्यांना
नवासा इशारा, हवासा इशारा, मनमोही इशारा तुझा
नवासा इशारा, हवासा इशारा, मदमोही इशारा तुझा

Autor(en): Mandar Cholkar, Rohan

Rohan Pradhan feat. Shreya Ghoshal - Bonus - EP
Album Bonus - EP
Veröffentlichungsdatum
25-02-2020

Attention! Feel free to leave feedback.
//}