Swapnil Bandodkar - Radhe Krushna Naam Songtexte

Songtexte Radhe Krushna Naam - Swapnil Bandodkar

वृन्दावनी सारंग हा, का लावी घोर जिवाला
झाली अशी वेडी पिशी, कोणी जाऊन सांगा त्याला
वृन्दावनी सारंग हा, का लावी घोर जिवाला
झाली अशी वेडी पिशी, कोणी जाऊन सांगा त्याला
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
कधी झर-झर पाण्यातून सूर-सूर येती कानी
(स रे प)
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम
डोई वरती घागर घेऊनी
जाई राधा नदी किनारी
हळूच कुठूनसा येई मुरारी
बावरलेली होई बिचारी
शब्द शब्द अवघडले
परि नजरेतूनच कळले
शब्द शब्द अवघडले
परि नजरेतूनच कळले
आज ऐकण्यादी कान होई अधीर-अधीर मन
(स रे प)
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम
गोड गोजिरी, मूर्त सावळी
प्रीतीची तव रीत आगळी
म्हणती सारे आज गोकुळी
राधा माधव नाही वेगळे
मनी चांदणे फुलती
पाहुनिया आपुले नाते
मनी चांदणे फुलती
पाहुनिया आपुले नाते
कधी येणार येणार श्याम रोखुनिया डोळे प्राण
(स रे प)
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम
वृन्दावनी सारंग हा, का लावी घोर जिवाला
झाली अशी वेडी पिशी, कोणी जाऊन सांगा त्याला
वृन्दावनी सारंग हा, का लावी घोर जिवाला
झाली अशी वेडी पिशी, कोणी जाऊन सांगा त्याला
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
कधी झर-झर पाण्यातून सूर-सूर येती कानी
(स रे प)
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम, घे गौळण राधा
राधे कृष्ण, राधे कृष्ण नाम

Autor(en): Ashok Patki

Attention! Feel free to leave feedback.