Swapnil Bandodkar - Tujha Dhyas Ha Songtexte

Songtexte Tujha Dhyas Ha - Swapnil Bandodkar




हे भास तुझे दिनरात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा की गंध प्रिये
दरवळतो अवती भवती
उधळून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी की फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
धुके पांघरुनी पहाटे पहाटे
तुझी याद माझा जीव जाळते
सुटे भान सारे दिशाभूल होते
तुझा गंध जेव्हा सांज माळते
हवासा हवासा, तरी सोसवेना
तुझ्या आठवांचा ऋतू ओसरेना
आभास तुझा रिमझिमतो
हरवून मला मी जातो
चाहूल तुझी की फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
कधी चिंब राती उगा भास होती
तुझ्या चेहऱ्याने चांद हासतो
कधी पावलांचा तुझ्या नाद येतो
जीवाला नव्याने वेड लावतो
कसे सावरावे मनाला कळेना
उरी मेघ दाटे परी ओघळेना
एकांत गुलाबी होतो
बहरून पुन्हा मी येतो
चाहूल तुझी की फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
हे भास तुझे दिनरात असे
बेचैन जीवाला करती
हा छंद तुझा की गंध प्रिये
दरवळतो अवती भवती
उधळून मला मी गातो
ये साद सुरांनी देतो
चाहूल तुझी की फसवी वेडी आशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा
तुझा ध्यास ही धुंद वेडी नशा




Attention! Feel free to leave feedback.