Mangesh Chavan - Zimmad Maandat Lyrics

Lyrics Zimmad Maandat - Mangesh Chavan




झिम्माड माडात, वेड्याश्या किनाऱ्यात
येना कधी, हो, येना कधी
ओल्याश्या शहाऱ्यात, बावऱ्या स्वप्नात
येना कधी, हो, येना कधी
थरथर श्वासात, चिंब इशाऱ्यात, भिजलेल्या नात्यात
येना कधी, हो, येना कधी, हो
झिम्माड माडात, वेड्याश्या किनाऱ्यात
येना कधी, हो, येना कधी
ओल्याश्या शहाऱ्यात, बावऱ्या स्वप्नात
येना कधी, हो, येना कधी
रात्र वेडी आठवांची, साद आली पावसाची
वेळ झाली चिंबण्याची, थेंब वेडे चुंबण्याची
हो, रात्र वेडी आठवांची, साद आली पावसाची
वेळ झाली चिंबण्याची, थेंब वेडे चुंबण्याची
थरार सुखाचा, भरल्या काठाचा
उधाण या लाटांचा, घे गोंदुनी, हो, घे गोंदुनी
झिम्माड माडात, वेड्याश्या किनाऱ्यात
येना कधी, हो, येना कधी
बोलती हे प्राण आता, स्पर्श सारे पूर होता
जागती ह्या गंधवाटा स्वप्न वेडे मी पाहता
हो, बोलती हे प्राण आता, स्पर्श सारे पूर होता
जागती ह्या गंधवाटा स्वप्न वेडे मी पाहता
बिलग मनास, भिजव तनास, सजल्या काळोखास
घे ओढूनी, हो, घे ओढूनी, हो
झिम्माड माडात, वेड्याश्या किनाऱ्यात
येना कधी, हो, येना कधी
ओल्याश्या शहाऱ्यात, बावऱ्या स्वप्नात
येना कधी, हो, येना कधी
येना कधी, हो, येना कधी
येना कधी, हो, येना कधी



Writer(s): Nilesh Mohrir, Arun Mhatre


Attention! Feel free to leave feedback.