Sadhana Sargam - Pasaydan Lyrics

Lyrics Pasaydan - Sadhana Sargam




आता विश्वात्मकें देवें येणे वाग्यज्ञें तोषावें
तोषोनिं मज ज्ञावे पसायदान हें
जें खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी- रती वाढो
भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचें
दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्यें पाहो
जो जे वांच्छिल तो तें लाहो प्राणिजात
वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी भेटतु भूतां
चलां कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचें गाव
बोलते जे अर्णव पीयूषाचे
चंद्र्मे जे अलांछ्न मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु
किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी
भजिजो आदिपुरुखी अखंडित
आणि ग्रंथोपजीविये विशेषीं लोकीं इयें
दृष्टादृष्ट विजयें होआवे जी
येथ म्हणे श्री विश्वेशराओ हा होईल दान पसावो
येणें वरें ज्ञानदेवो सुखिया जाला



Writer(s): Traditional, Hrishikesh Saurabh Jasraj


Attention! Feel free to leave feedback.