Salil Kulkarni - Man Maze Chapal Lyrics

Lyrics Man Maze Chapal - Salil Kulkarni



मन माझें चपळ राहे निश्चळ
घडी एकी पळ स्थिर नाहीं ॥१॥
आतां तूं उदास नव्हें नारायणा
धांवें मज दीना गांजियेलें ॥२॥
धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी
केलें तडातोडी चित्त माझें ॥३॥
तुका ह्मणे माझा चले सायास
राहिलों हे आस धरुनी तुझी ॥४॥



Writer(s): Salil Kulkarni


Salil Kulkarni - Sandhiprakashat
Album Sandhiprakashat
date of release
08-07-2009




Attention! Feel free to leave feedback.