Swapnil Bandodkar - I Love You Lyrics

Lyrics I Love You - Swapnil Bandodkar




वेळावल्या सुरांनी, आभाळ चांदणे
हातात थरथरावी लाजून कांकणे
चाहुल येता अंतरातून काही उधाळते
असे रान ओले साद वेळी घालते
आज बेहोश, बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
"I love you, I love you
I love you, I love you"
चांद हा झाला जणू खुळा
डोहात आपले प्रतिबिंब आज पाहुनी
चांद हा झाला जणू खुळा
डोहात आपले प्रतिबिंब आज पाहुनी
अलवार ही मिठी, उमलून पाकळी
छंदात या, रंगात या जा रंगुनी
आज बेहोश, बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
"I love you, I love you"
मोकळ्या केसात या तुझ्या
हरवून जाऊ दे गंधाळल्या अशा क्षणी
मोकळ्या केसात या तुझ्या
हरवून जाऊ दे गंधाळल्या अशा क्षणी
वाटेत बावरा, निशिगंध कोवळा
श्वासातूनी, स्पर्शातूनी तू साजणी
आज बेहोश, बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
"वेळावल्या सुरांनी आभाळ चांदणे
हातात थरथरावी लाजून कांकणे
चाहुल येता अंतरातून काही उफाणते
असे रान ओले साद वेळी घालते"
आज बेहोश, बेधुंद वारा
लाट ओलांडुनी हा किनारा
चांदण राती कानी तुजला सांगते
"I love you, I love you, I love you"



Writer(s): Josef Larossi, Andreas Jonas Sammy Romdhane



Attention! Feel free to leave feedback.
//}