Asha Bhosle - Chandane Shimpit paroles de chanson

paroles de chanson Chandane Shimpit - Asha Bhosle




चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
ओंजळीं उधळीत मोतीं
ओंजळीं उधळीत मोतीं
हासरी ताराफुलें
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
ओंजळीं उधळीत मोतीं
ओंजळीं उधळीत मोतीं
हासरी ताराफुलें
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
वाहती आकाशगंगा कीं कटीची मेखला
वाहती आकाशगंगा कीं कटीची मेखला
कीं कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफिलें
ओंजळीं उधळीत मोतीं
हासरी ताराफुलें
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
गुंतविले जीव हे
गुंतविले जीव हे
मंजीर कीं पायीं तुझ्या
जे तुझ्या तालावरी बोलांवरी नादावले
ओंजळीं उधळीत मोतीं
हासरी ताराफुलें
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी
गे निळावंती कशाला झाकिसी काया तुझी
झाकिसी काया तुझी
पाहूं दे मेघांविन सौंदर्य तुझे मोकळे
ओंजळीं उधळीत मोतीं
हासरी ताराफुलें
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले
चांदणे शिंपीत जाशी, चालतां तूं चंचले



Writer(s): Raja Badhe


Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.
//}