Lalita Phadke - Motha Motha Dola paroles de chanson

paroles de chanson Motha Motha Dola - Lalita Phadke




मोठं-मोठं डोळं तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
मोठं-मोठं डोळं तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय
माझ्या डोळ्याची मासळी त्यात
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
नको दावू धाक मला, डोळं तुझं झाक
नको दावू धाक मला, डोळं तुझं झाक
आल्या-गेल्या भुलतील, मी भुलायची न्हाय रं
भुलायची न्हाय रं, भुलायची न्हाय रं
आल्या-गेल्या भुलतील, मी भुलायची न्हाय रं
भुलायची न्हाय रं
लाडी-गोडी सोड, भारी बोलणं तुझं गोड
लाडी-गोडी सोड, भारी बोलणं तुझं गोड
सवालाला जबाब मी देणार न्हाय रं
देणार न्हाय रं, देणार न्हाय रं
सवालाला जबाब मी देणार न्हाय रं
देणार न्हाय रं
शिकारीची हाव तुला, हरणीमागं धाव
हरणीमागं धाव, हरणीमागं धाव
रानातली साळू तुला मिळायची न्हाय रं
मिळायची न्हाय रं, मिळायची न्हाय रं
रानातली साळू तुला मिळायची न्हाय रं
मिळायची न्हाय रं
पुरे तुझी ऐट माझ्या बापाला भेट
माझ्या बापाला भेट
पुरे तुझी ऐट माझ्या बापाला भेट
माझ्या बापाला भेट
लगीन झाल्याबगार मी बघायची न्हाय रं, हो
बघायची न्हाय रं, बघायची न्हाय रं
लगीन झाल्याबगार मी बघायची न्हाय रं
बघायची न्हाय रं
मोठं-मोठं डोळं तुझं कोळ्याचं जाळं
माझ्या डोळ्याची मासळी त्यात
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
गावायची न्हाय रं, गावायची न्हाय रं
गावायची न्हाय रं



Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.