paroles de chanson Raga Bhairavi: Dhun In Ek Taal "Sakhi Sham Nahi Aaye" - Pandit Bhimsen Joshi
सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?
मधुरात्र मंथर देखणी,
आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला,
त्या अर्थ तू देशिल का?
हृदयात आहे प्रीत अन ओठांत आहे गीत ही ते प्रेमगाणे छेडणारा,
सूर तू होशिल का?
जे जे हवे ते जीवनी,
ते सर्व आहे लाभले तरी ही उरे काही उणे,
तू पूर्तता होशिल का?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी,
पण सांग तू येशिल का?

Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.