Sandeep Khare - Kai Ti Karte Khuna paroles de chanson

paroles de chanson Kai Ti Karte Khuna - Sandeep Khare



काय ती करते खुणा
अन् काय माझ्या कल्पना
काय बोले सत्य
आणि काय माझ्या वल्गना || धृ. ||
एकदा ती हासली
अन् जन्म झाला सार्थ हा
क्षणभरावर नोंद केवळ
युगभरावर वंचना || ||
एवढेही तू नको
घेऊ मनावर शब्द हे
जा तुला म्हटलो खरा मी
पण जराशी थांब ना || ||
त्या तुझ्या वाटेवरी
मज ठेच जेव्हा लागली
गात उठले घाव ते
अन् नाचल्या त्या वेदना || ||
क्रूर हे रस्ते तुझे
पण मीही इतका निश्चयी
टोचत्या काट्यास माझे
पाय देती सांत्वना || ||
गाव माझे सोडताना
एवढे तू ऐक ना
नाव माझे टाकताना
तू उसासा टाक ना || ||
ऐलदेशी शुष्करानी
पंख मिटला मोर मी
पैलदेशातून थोडे
पावसाळे धाड ना || ||.




Sandeep Khare - Ja Dile Mann Tula
Album Ja Dile Mann Tula
date de sortie
05-08-2013




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.