Shreya Ghoshal - Aatach Baya Ka Baavarla paroles de chanson

paroles de chanson Aatach Baya Ka Baavarla - Shreya Ghoshal



हळद पिवळी, पोर कवळी, जपून लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
हे गजर झाला दारी, साजनाची स्वारी
साजनाची स्वारी आली लाज गाली आली
जपुन होतं ठिवलं मन ह्ये कधीच न्हाई झुरलं
उधळलं गं समदं बाई हातात न्हाई उरलं
जीव जडला पर न्हाई नजरंला कळलं
किती नडलं जिकीरीनं मागं ना सरलं
आताच बया का बावरलं
खरंच बया का घाबरलं
साद तू घातली, रान पेटून आली
कावरी बावरी लाज दाटून आली
पाहीलं गुमान बाई
घ्येतलं दमानं बाई
च्येतलं तुफान साजना
बेभान झाले साजना
नजरंला नजरंचं नजरंनं कळलं
मन ईवलं इरघळलं अन् नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरंच बया का घाबरलं
मन झालं धुंद, बाजिंदं, ललकारी गं
पिरतीचा गंध, आनंद नवलाई गं
लागली ओढ
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून झालं समदंच ग्वाड
लागलं सजनीला सजनाचं याड
झालीया भूल ही उमजली या मनाला
परतूनी घाव हा लागला रं जीवाला
डोळं झाकलेलं बाई
रेघ आखलेलं बाई
मागं रोखल्यालं साजना
उधळून ग्येलं साजना
हारलंया पिरमाला पिरमानं जिकलं
झगडुनी मन माझं, आदबीनं झुकलं
साजना तू सावरलं



Writer(s): Ajay Atul


Shreya Ghoshal - Sairat (Original Motion Picture Soundtrack) - EP




Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.