Sonu Nigam - Yeshil Tu paroles de chanson

paroles de chanson Yeshil Tu - Sonu Nigam



मला माहीत आहे की असे होणार आता
फुलांनी नाव लिहिण्याचा ऋतू येणार आता
तुला मी पाहतो म्हणुनी, खरी सजशील तू जेव्हा
मनाच्या आत डोकावून मला बगशील तू तेव्हा
नकळता लाजुनी होकार देशील तू
येशील तू, येशील ना?
येशील तू, येशील ना?
मला वाटते, ते तुला वाटते होय ना?
इथे बहर येता, तिथे उमलते होय ना?
जरी आहे जरा अंतर, अवस्था वेगळी नाही
जरा ही भान लोकांचे तुला नाही, मला नाही
नजर भिडता क्षण अलवार होशील तू
येशील तू, येशील ना?
येशील तू, येशील ना?
जशी ही हवा, हो, तसा मी तुझ्याभोवती
उन्हाला जशी सावली, मी तसा सोबती
कुणाला भेटणे नाही, कुणाशी बोलणे नाही
तुझा होकार येतो, जिवाचे पारणे नाही
मला माझे जिणे आणून देशील तू
येशील तू, येशील ना?
येशील तू, येशील तू



Writer(s): Vaibhav Joshi, Alap Desai


Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.