Alap Desai & Anandi Joshi - Tuzi Athavan paroles de chanson

paroles de chanson Tuzi Athavan - Alap Desai feat. Anandi Joshi



पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
पावसाच्या सरी परी येणे जाणे तुझे
ओल्या चिंब ओठांवरी ओले गाणे तुझे
मोहरल्या मातीतले अत्तर तू
देहातल्या कवितेचे अक्षर तू
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
माझ्या मनी गुंतलेले असे तुझे मन
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
जेव्हा जेव्हा येतो तुझ्या दिशातून वारा
अनावर लाटांवर डोलतो किनारा
पुन्हा माझ्या वाळूवर नाव तुझे
पावलांचे ठसे भरधाव तुझे
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
परतीच्या वाटेलाही तुझेच वळण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
अचानक गर्दीतही वाटते एकटे
भरलेले शहर हे होते रिते-रिते
ओळखीची अनोळखी भुल ही तू
हूल ही तू माझी चाहूल ही तू
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जागोजागी विखुरलेले माझे मी-पण
जिथे जिथे जावे तिथे
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण
तुझी आठवण



Writer(s): Vaibhav Joshi, Alap Desai


Alap Desai & Anandi Joshi - Miss U Mister (Original Motion Picture Soundtrack) - Single



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.