Swapnil Bandodkar - O Priya paroles de chanson

paroles de chanson O Priya - Swapnil Bandodkar




सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
प्रिया ...
एका एका नजरेचे
तीर तुझ्या डोळ्यांचे
झेलतो मी उरी
आता तरी हो राजी
आता तरी हो माझी
तूच माझी खरी
प्रिया ...
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा
सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
प्रिया ...
केले तुला मी राजीखुशी
तू ये ना जरा माझ्यापाशी
झालो आता मी वेडाखुळा
हो ना तूही वेडी जराशी
तारुण्य हे माझे नशिले
वय हे गुलाबी तुझे
ये देऊया ते एकमेका
दोघांस जे पाहिजे
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा
सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
प्रिया
झालो तुझा मी आहे तुझा
हे बोलू तुला मी कितीदा
कळले तुला - मी मर्जी तुझी;
तू आहेस माझा इरादा
बैचेन तू बेभान मीही
नाही कशाची कमी
आहे जसा दिलदार मी
अन तूही तशी रेशमीss
तुझी हि चाल तुझा तोरा ...
तुझा हा डौल नवा कोरा
बंदा तुझा मी खरा
यंदा जुळून येऊ दे
दोघांची रंगीत प्रेम कथा
सोनेरी तुझी काया
चंदेरी तुझी छाया
छान बांधा तुझा
दूर कसा राहू मी
किती तुला पाहू मी
छान मुखडा तुझा
प्रिया
एका एका नजरेचे
तीर तुझ्या डोळ्यांचे
झेलतो मी उरी
आता तरी हो राजी
आता तरी हो माझी
तूच माझी खरी
प्रिया ...



Writer(s): ajay-atul


Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.
//}