Meenal Jain - Mazya Manala текст песни

Текст песни Mazya Manala - Meenal Jain



अल्लड फुलपाखराला आकाशी जाऊ दे
आकाशी जाऊ दे
कुजबुजणाऱ्या मनाला सरगम ही गाऊ दे
सरगम ही गाऊ दे
रंगात या तुझ्या स्वप्नांना न्हाऊ दे
आशेचा रंग हा चढताना पाहू दे
माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे
तुझ्या नावाला जरा माझ्या नावात ही राहू दे
हा वारा कानात हळूच माझ्या
सांगतो कविता तुझी घुटमळताना
क्षण सारे जसे साखरेचे दाणे
तुझी गोळी लावती विरघळताना
सवयी साऱ्या जुन्या वळणावर जाऊ दे
रस्ते हे प्रीतीचे जुळताना पाहू दे
माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे
तुझ्या नावाला जरा माझ्या नावात ही राहू दे
रंग हा चेहऱ्यावर माझ्या
तुझ्या प्रीतीचा अनोखा
आरसा भासतो हा मला
तुझ्या भेटीचा झरोखा
नात्याची काच ही स्पर्शुनी पाहू दे
भोळीशी आस ही डोळ्यांना लावू दे
हृदयाची आँच ही भडकूणी जाऊ दे
माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे
तुझ्या नावाला जरा माझ्या नावात ही राहू दे
माझ्या मनाला तुझ्या प्रेमात या वाहू दे
तुझ्या नावाला जरा माझ्या नावात ही राहू दे रे



Авторы: Rohan Anil Pradhan, Rohan Jayant Gokhale, Jai Atre


Meenal Jain - Dostigiri (Original Motion Picture Soundtrack)
Альбом Dostigiri (Original Motion Picture Soundtrack)
дата релиза
26-07-2018




Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.