Asha Bhosle feat. Varsha Bhosle - Kunya Rajana Rajana текст песни

Текст песни Kunya Rajana Rajana - Asha Bhosle feat. Varsha Bhosle




कोण्या राजानं-राजानं शेवडी खंदली
अन कोण्या राणीनं-राणीनं पाणीजं भरलं
(अन कोण्या राणीनं-राणीनं पाणीजं भरलं)
कोण्या राजानं-राजानं शेवडी खंदली
कोण्या राणीनं-राणीनं पाणीजं भरलं, पाणीजं भरलं
कोण्या राणीचं-राणीचं तोडेजं हरपलं
कोण्या राजानं-राजानं उचलून घेतलं
(कोण्या राजानं-राजानं उचलून घेतलं)
कोण्या राणीनं-राणीनं तोडेजं मांगलं
कोण्या राजानं-राजानं तोडेजं दिधलं, तोडेजं दिधलं
कोण्या राजाच्या-राजाच्या डोल्यांत भरली
अन कोण्या राणीला-राणीला दीठजं लागली
(अन कोण्या राणीला-राणीला दीठजं लागली)
(हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा)
(हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा)
(बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा)
(हायल्या बांधती, चिमण्या कोंडती)
(हायल्या बांधती, चिमण्या कोंडती)
(फुलाच्या फडकीवरी माय लगीन लाविती)
(केळीच्या पानावरी माय बामन जेविती)
बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा
बंधुनं बायको केली, बाईल केली
माय पदर सोन्याचा, माय पदर सोन्याचा
(हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा)
(बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा)
(हा पाय शेणाचा, हा पाय मेणाचा)
(बंधुनं बायको केली माय पदर सोन्याचा)



Авторы: Hridaynath Mangeshkar, N D Mahanor



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.