Текст песни




उठ पंढरीच्या राजा
वाढवेळ झाला
उठ पंढरीच्या राजा
वाढवेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी
दर्शनासी आला, दर्शनासी आला
उठ पंढरीच्या राजा
पूर्व दिशी उमटे भानू
घूमे वारियाचा वेणू
पूर्व दिशी उमटे भानू
घूमे वारियाचा वेणू
सूर-सूर वेणूचा त्या
सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा
कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा
गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा
पुंडलिक हाका देई
उभ्या राही रखुमाबाई
पुंडलिक हाका देई
हाका देई, हाका देई
उभ्या राही रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती
सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा
उठ पंढरीच्या राजा




Prasad Sawkar - Prasad Sawarkar - Ghei Chhand
Альбом Prasad Sawarkar - Ghei Chhand
дата релиза
01-04-2010



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
Загрузка
Загрузка