Текст песни




माझ्या मना विसरू नको
कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा
माझ्या मना विसरू नको
कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा
जशा या उमलत्या अबोली फुलांच्या
इवल्या-इवल्या कोवळ्या कळ्या
शब्दात सांगू शके ना मन हे
सांगू कसे ना कळे
मला उमगले, जगणे गवसले
तुझ्या गोड स्वप्नांमुळे
मन माझे बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते
बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते
आज मी जगते जशी
परक्या मनांची स्पंदने
आत मी झुरते कशी
हरवूनी स्वतःचे असे जगणे
क्षणात सगळे क्षण हे विखुरले
वेचू कसे ना कळे
श्वासात शोधू शके ना जगणे
शोधू कुठे ना कळे
मन माझे बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते
बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते
आज तू भरू दे मला
रंग या जीवनाचे पुन्हा
बहरून गेल्या दिशा
मन माझे बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते
बेभान झाले सावरू कसे?
बेधुंद झाले भिरभिर फिरते



Авторы: Rohan Anil Pradhan, Rohan Jayant Gokhale, Vijay Deoskar, Tejas Prabha


Rohan Pradhan - Bucket List
Альбом Bucket List
дата релиза
17-05-2018



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.
Загрузка
Загрузка