Chinmayi Sripada - Majha Baji (From "Baji") Lyrics

Lyrics Majha Baji (From "Baji") - Chinmayi Sripada



माझा बाजी आला परतुनी, माझा बाजी सखा
माझा बाजी आला परतुनी, माझा बाजी सखा
तुझी-माझी जुनी ओळख ही तुच सखा
हलके-हलके, मन हे हलके
उडते-उडते दाही दिशा
झुलते-झुलते, या वेळी झुलते
हसते-हसते डोळ्यात ह्या
जुन्या दिवसाच्या त्या आठवणी
खुळ्या मैत्रीतल्या
कधी हसण्याच्या-रुसण्याच्या
उष्ट्या कैरीतल्या
बघते-बघते, ये वळ मी बघते
दिसतात त्या का जुन्या खुणा
झुलते-झुलते, मन हे झुलते
आठवता ते पुन्हा-पुन्हा
वारे-वादळ संकटाचे सारे झेलून छाती वरती
येशी धावून काळ्या रात्री सुद्धा बोलवता तुला
उचलुनी तू घेशील मला हाती तुझ्या
विरते-विरते, भय सारे विरते
घेशी तू जेव्हा जवळी मला
उरते-उरते, ना काही उरते
बिलगूनी जाते जेव्हा तुला
हलके-हलके, मन हे हलके
उडते-उडते दाही दिशा



Writer(s): Shrirang Godbole, Atif Afzal


Chinmayi Sripada - Majha Baji (From "Baji")
Album Majha Baji (From "Baji")
date of release
12-01-2015




Attention! Feel free to leave feedback.