Swapnil Bandodkar - Tula Pahile Lyrics

Lyrics Tula Pahile - Swapnil Bandodkar




नकळत का असे घडते
नजरेला नजर भिडते,
अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा...
काही कळे तुला,
काही कळे मला...
चाहूल भेटण्याची,
ही ओढ वाहण्याची
या उधाणल्या लाटेवरती जीव होतो खुळा...
तुझ्याकडे रुसायचे,
तुझ्यासवे हसायचे
अबोल मी, अबोल तू, मनातले कळायचे
स्वप्न सावलीचे जपून मी पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती ऊन भेट मला
काही कळे तुला, काही कळे मला
शहारल्या क्षणांतही अपूर्ण मी अपूर्ण तू
उन्हातल्या धुक्यातुनी खुणावतो नवा ऋतू
भास आठवांचे असूनही पुन्हा पुन्हा
या अनोळखी वाटेवरती स्पर्श भेटे मला...
काही कळे तुला,
काही कळे मला.



Writer(s): Guru Thakur


Attention! Feel free to leave feedback.