Vaishali Samant - Ya Chandra Vela Asha Lyrics

Lyrics Ya Chandra Vela Asha - Vaishali Samant




या चंद्रवेळा अशा उरी उठते काहूर
माझा धपापतो जीव आले अंग मोहरून
हे पेटले रान पिठूर ज्वालांचा मोहोर
माझा साजण दूर कसे ठेऊ चित्त स्थिर
कसे सांभाळू मनाला त्याचा आठव ओठाला
एक प्रहर लोटला पाठ टेके ना शेजेला
हाती जडवली मेंदी पायी पैंजण सजले
शालू जरीचा नेसले भाळी कुंकुम रेखिले
माझ्या सजणाचे रूप मी बिंबात पाहिले
लक्ष किरणांचा हात फिरे अंगांग उधळ
मी झाकले कमल झाले राधेहून चूर
मुक्त मनाचा प्रवास माझा चांदण्यांचा रथ
मी पुसले संस्कार माझा साजण दूर




Attention! Feel free to leave feedback.