Saurabh Salunke - Abhala (Saurabh Version) paroles de chanson

paroles de chanson Abhala (Saurabh Version) - Saurabh Salunke



आभाळा, आभाळा
आभाळा (आभाळा)
आभाळा, आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
कसदार बीजापोटी कसा तरारला इळा
कसदार बीजापोटी कसा तरारला इळा
बांडगुळा पाई झाडं काढतं का गळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं
उगवला कसा काय सूर्य ह्यो जांभळा रं
ईपरीत घडतंया काळ ह्यो आंधळा
मातीचा का तुला न्हाई थांग आभाळा
कसं फेडू धरणीचं पांग, आभाळा रं
(आभाळा, आभाळा, आभाळा)
आभाळा, आभाळा
आभाळा, आभाळा, आभाळा
इस्काटला मळा, मातीचा जिव्हाळा
इस्काटला मळा, मातीचा जिव्हाळा
उरफट्या या पैश्यापौटी मांडला लिलाव
खुरपली नाती-गोती मोडला तू डाव
इकलि तू काळी माती, सोडला तू गांव
केसवल डाळी केला भावकीचा भाव
आता कुठ ठाव
आता कुठ ठाव रं, उष्ट्यासाठी धाव रं
(आभाळा, आभाळा)
आभाळा, आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
ढेकळात रुज हिथं हरेकाची नाळ रं (नाळ रं)
रगतात माती अंगी रग मायंदाळ (मायंदाळ रं)
एक बुक्कीत फोडली गाठीची बाभळ
कुस्तीमंदी लोळवला मल्ल महाबळ
फाळावानी हात, तुझा काळावाणी घाव
फाळावानी हात, तुझा काळावाणी घाव
आता कुठ ठाव
आता कुठ ठाव रं, उष्ट्यासाठी धाव रं
आभाळा, आभाळा
(आभाळा, आभाळा, आभाळा)
(आभाळा, आभाळा, आभाळा)
(आभाळा, आभाळा, आभाळा)



Writer(s): Narendra Bhide, Pranit Kulkarni


Saurabh Salunke - Mulshi Pattern (Original Motion Picture Soundtrack)



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.