Rohan Pradhan - Baba текст песни

Текст песни Baba - Rohan Pradhan




बाबा मला कळलेच नाही
तुझ्या मनी वेदना
कसा मी राहू, बोल कुठे जाऊ?
मला काही समजेना
साद हा घालतो लाडका तुझा
जगण्या तू दिला माझ्या जिवा अर्थ खरा
बाबा, थांब ना रे, तू बाबा
जाऊ नको दूर, बाबा
थांब ना रे, तू बाबा
दैव होता तू, देव होता तू
खेळण्यातला माझा खेळ होता तू
शहाणा होतो मी, वेडा होता तू
माझ्यासाठी का रे सारं खर्च केलं तू?
आज तू फेडू दे पांग हे मला
जगण्या रे मला अजुनही तुच हवा
बाबा, थांब ना रे, तू बाबा
जाऊ नको दूर, बाबा
थांब ना रे, तू बाबा
पाय हे भाजले अश्रूंच्या उन्हात
हाक दे, हात दे, श्वास दे पुन्हा
बाबा, बोल ना, बोल ना
बोल ना, बोल ना
बाबा, थांब ना रे, तू बाबा
जाऊ नको दूर, बाबा
थांब ना रे, तू बाबा



Авторы: Manoj Yadav, Rohan Rohan


Rohan Pradhan - Ventilator
Альбом Ventilator
дата релиза
31-08-2016



Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.