Sadhana Sargam - Paus Vedya текст песни

Текст песни Paus Vedya - Sadhana Sargam

पाऊस वेड्या त्या क्षणांना बिलगून मीच हरवले
कणाकणांतुन त्या सरींच्या बकुळ होऊनी फुलले, हो
पाऊस वेड्या त्या क्षणांना बिलगून मीच हरवले
कणाकणांतुन त्या सरींच्या बकुळ होऊनी फुलले, हो-ओ
कधी पकडले थेंब टपोरे पसरून मी पदरात
कधी निथळले स्वच्छ मनाने सळसळत्या धारेत
कधी पकडले थेंब टपोरे पसरून मी पदरात
कधी निथळले स्वच्छ मनाने सळसळत्या धारेत
डोंगरमाथ्यावरी निनादे हाक आर्त हृदयात
तृप्त मिठी ती मिसळून जाई एकरूप जमिनीत, हो-ओ
पाऊस वेड्या त्या क्षणांना बिलगून मीच हरवले
कणाकणांतुन त्या सरींच्या बकुळ होऊनी फुलले, हो-ओ
खट्याळ अवखळ बालपणी मी चक्क तुळविले तुला
खट्याळ अवखळ बालपणी मी चक्क तुळविले तुला
तरी दिली तू सुप्त सृजनता रागवता मला
हिरव्या-हिरव्या पातीवरले दवबिंदू वेचले
इंद्रधनूचे रंग लपेटून चिंब-चिंब नाचले, हो-ओ
पाऊस वेड्या त्या क्षणांना बिलगून मीच हरवले
कणाकणांतुन त्या सरींच्या बकुळ होऊनी फुलले, हो-ओ
रखरखत्या श्रुष्टीत आता रसरसुनी ओलावले
रंगरूप अन गंध लेवूनी सुखकर मजला भासले
रखरखत्या श्रुष्टीत आता रसरसुनी ओलावले
रंगरूप अन गंध लेवूनी सुखकर मजला भासले
त्या स्पर्शाने, त्या हर्षाने उरात गाणे भिनले
सुस्वर कोकीळ सांगे मी ही तेच गीत गायिले, हो-ओ
पाऊस वेड्या त्या क्षणांना बिलगून मीच हरवले
कणाकणांतुन त्या सरींच्या बकुळ होऊनी फुलले, हो-ओ

Авторы: Ashok Patki, Rekha Gandewar

Sadhana Sargam - Paus Manatala
Альбом Paus Manatala
дата релиза
01-01-2013

Внимание! Не стесняйтесь оставлять отзывы.