Lata Mangeshkar - Ganga Jamuna Dolyant Ubhya Ka (From "Sumadhur Geeten") Lyrics

Lyrics Ganga Jamuna Dolyant Ubhya Ka (From "Sumadhur Geeten") - Lata Mangeshkar




गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा
कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले, आले, घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे-सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती, जा
दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस डोळे या पदराने सावर ही साडी
रूप दर्पणी मला ठेवुनी जा
मोठयांची तू सून पाटलिण मानाची
हसले तुझे हिरवे बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे-मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरू परि आईला, जा



Writer(s): VASANT PRABHU, P SAVALARAM


Attention! Feel free to leave feedback.