Lata Mangeshkar - Muli Tu Aalis Apulya Ghari (From "Sumadhur Geeten") Lyrics

Lyrics Muli Tu Aalis Apulya Ghari (From "Sumadhur Geeten") - Lata Mangeshkar




लिंबलोण उतरता अशी का झालीस बावरी
मुली तू, आलीस अपुल्या घरी
हळदीचे तव पाउल पडता
घरची लक्ष्मी हरखुन आता
सोन्याहुनी झाली पिवळी
मांडवाला कवळुन चढली, चैत्रवेल ही वरी
भयशंकित का अजुनी डोळे?
नको लाजवू सारे कळले
लेकीची मी आहे आई
सासुरवाशिण होऊन मीही, आले याच घरीं
याच घरावरी छाया धरुनी
लोभ दाविती माय पक्षिणी
हसते घर हे तुझ्या दर्शनी
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुनि माझ्या उरीं



Writer(s): P. SAVALARAM, VASANT PRABHU


Attention! Feel free to leave feedback.