Shankar Mahadevan - Saang Tu Sakhaye Majala Lyrics

Lyrics Saang Tu Sakhaye Majala - Shankar Mahadevan



सांग तू सखये मजला
जखमा दिलेल्या अजुनी विरल्या
सल तो मनाचा अजुनी सरला
सजवुनी जीवन का केली निराशा
रूजली आशा का सांजवेळी
सागरलाटांची साथ ओली
सारीपाट शपथांचा तो नटला
अधरांची भाषा रंगून गेली
स्वप्नफुलाला या काटे का रूतले गं
रिमझिमत्या मेघांचे थेंब विरले गं
विझल्या ज्वाळा बुझल्या वाटा
कुठवर साहू हा वादळवारा
बदलून गेली सारी दुनिया
स्वप्न उरीचे गेले विलया
बेसूर झाले जीवनगाणे
भेदून गेला तीर ह्रदया
परतून स्वप्नांना आकार देशील का?
छेडून सूरगीत प्रीतीचे गाशील का?
विसरून सारे बिलगून मजला
जीवनी रंग नवे भरशील का?



Writer(s): kedar pandit


Shankar Mahadevan - Shravan Dhara
Album Shravan Dhara
date of release
01-01-2000




Attention! Feel free to leave feedback.