Avadhoot Gupte feat. Vaishali Made - Un Un vhatat paroles de chanson

paroles de chanson Un Un vhatat - Vaishali Made , Avadhoot Gupte



ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
ऊल ऊल उलघाल...
ऊल ऊल उलघाल दोन जीव भांगल
एक जीव होण्यापायी उधाळली दंगल
उधाळली दंगल जीवघेणी दंगल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
आधण आधण, चहाचं आधण
घोट चाखते व्हटानं
आधण आधण, चहाचं आधण
घोट चाखते व्हटानं
पेशल पेशल
हेऽऽ पेशल पेशल, दरवळं केशर
लागीर भन्नाट ग्वाडीनं
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
समशेरी नजरेनं घायाळ मिठीत आभाळ
बळजोरी राकट मिठीची मधाळ पिरतीची
बिल्लोर टपोर डोळ्याची चांदणं मनाची
झिमपोरी मावळी घाटाची लढत श्वासांची
आसावली पोरं म्हनी...
आसावली पोरं म्हनी खुळवली ओढ
पेशल चहाची साखर मिठीवानी ग्वाड
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
हेऽऽ पारवळ नजरत काळजात गलबल
खळी गाली डोहावानी रूप नशा अंमल
पारवळ नजरत काळजात गलबल
खळी गाली डोहावानी रूप नशा अंमल
जागं जागं सपनात...
जागं जागं सपनात दोन जीव टांगल
एक घोट घेण्यापाई उठविलं जंगल
उठविलं जंगल गोरगोर जंगल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
आधण आधण, चहाचं आधण
घोट चाखते व्हटानं
आधण आधण, चहाचं आधण
घोट चाखते व्हटानं
पेशल पेशल
पेशल पेशल, दरवळं केशर
लागीर भन्नाट ग्वाडीनं
ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल
वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल
मोगरी मलमल



Writer(s): Narendra Bhide, Pranit Kulkarni


Avadhoot Gupte feat. Vaishali Made - Mulshi Pattern
Album Mulshi Pattern
date de sortie
27-11-2018



Attention! N'hésitez pas à laisser des commentaires.