Bela Shende - Wajle Ki Bara Lyrics

Lyrics Wajle Ki Bara - Bela Shende



हो-ओ, चैत पुनवेची रात आज आलिया भरात
धडधड काळजात माझ्या माई ना
कधी, कवा, कुठं, कसा? जीव झाला येडापीसा
त्याचा न्हाई भरवसा तोल ऱ्हाई ना
राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले
पिरतीच्या या रंगी राया, चिंब ओली मी झाले
राया, सोडा आता तरी, काळ येळ न्हाई बरी
पुन्हा भेटू कवातरी, साजणा
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
Hey, कशापायी छळता, मागं-मागं फिरता
असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी
ए, सहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली
आता १२ ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
जी-जी रे, जी
हो, ऐन्यावानी रुप माझं, उभी ज्वानीच्या मी उंबऱ्यात
नादावलं खुळं-पीसं कबुतर हे माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट ही चांदण्याची
उगा घाई कशापायी? हाय नजर उभ्या गावाची
(हे नारी गं, राणी गं, हाय नजर उभ्या गावाची)
ए, शेत आलं राखणीला, राघु झालं गोळा
शीळ घाली आडुन कोणी करून तिरपा डोळा
आता कसं किती झाकू, सांग कुठंवर राखू?
राया, भान माझं मला ऱ्हाई ना
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
Hey, कशापायी छळता, मागं-मागं फिरता
असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी
ए, सहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली
आता १२ ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
जी-जी रे, जी
हो, आला पाड, झाला भार, भरली उभारी घाटा-घाटात
तंग चोळी अंग जाळी, टच्च डाळींब फुटं व्हटात
गार वारं झोबणारं, द्वाड पदर जागी ठरं ना
आडोश्याच्या खोडीचं मी कसं गुपित राखू कळं ना
(हे नारी गं, राणी गं, कसं गुपित राखू कळं ना)
Hey, मोरावानी डौल माझा, मैनेवानी तोरा
औंदाच्या गा वर्साला मी गाठलं वय १६
जीवा लागलिया गोडी, तरी कळ काढा थोडी
घडी आताची ही तुम्ही ऱ्हाऊ द्या
मला जाऊ द्या ना-, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना-, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
अहो, जाऊ द्या ना घरी...
Hey, कशापायी छळता, मागं-मागं फिरता
असं काय करता दाजी, हिला भेटा की येत्या बाजारी
ए, सहाची बी गाडी गेली, नवाची बी गेली
आता १२ ची गाडी निघाली
हिला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की १२
जी-जी रे, जी, झालं जी



Writer(s): Ajay Atul, Guru Thakur


Bela Shende - Natarang (Original Motion Picture Soundtrack)
Album Natarang (Original Motion Picture Soundtrack)
date of release
01-01-2010




Attention! Feel free to leave feedback.